महाकाल प्रतिष्ठानकडून भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा जागर –
प्रतिनिधी | माण
नवरात्रोत्सवाचा भक्तिमय माहोल, गरबा-दांडियाचा ठेका आणि पारंपरिक वेशभूषेतील महिलांचा उत्साह अशा चैतन्यमय वातावरणात माण येथील ‘रासरंग नवरात्र महोत्सव २०२६’ रंगत आहे. महाकाल प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आयटी नगरीतील सांस्कृतिक उपक्रमांमध्ये प्रतिष्ठानने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष असून, परिसरातील महिला गरबा-दांडियामध्ये मोठया संख्येने सहभागी होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महिला, युवक-युवती आणि लहान मुलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे माण परिसरात उत्सहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दैनंदिन संसाराचा गाडा सांभाळणाऱ्या महिलांना आनंदाचे काही क्षण अनुभवण्याची संधी देतानाच, स्थानिक ग्रामस्थ आणि नोकरी-व्यवसायानिमित्त परिसरात स्थायिक झालेल्या नागरिकांना एकत्र आणण्याचे काम हा महोत्सव करत आहे. गावठाण, वाड्या-वस्त्या आणि निवासी सोसायट्यांतील नागरिकांच्या सहभागामुळे सामाजिक सलोख्याचे दर्शन सध्या माण गावात पाहायला मिळतं आहे. महाकाल प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा अभिषेक पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाचेही दिमाखात आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवात वारकरी बांधवांच्या सहभागातून सांस्कृतिक मिरवणूक आणि विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या प्रतिष्ठानने नवरात्रोत्सवातूनही संस्कृती संवर्धनाचा ध्यास जपला आहे. ‘परंपरेचा सन्मान, एकोप्याचा अभिमान’ या भावनेतून महाकाल प्रतिष्ठानचा हा उपक्रम सध्या माण-हिंजवडीसह संपूर्ण आयटीनगरी परिसरात लक्षवेधी ठरत आहे.

” माणदेवी गावाचं ग्रामदैवत आहे त्या, ठिकाणी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होते. नऊ दिवस ग्रामस्थ देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. युवा पिढी साठी, रास गरबा आणी दांडिया महोत्सव आम्ही भरवत आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. महाकाल प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी आणी एकोपा जपण्यासाठी प्रयत्न करत आहे.”
अभिषेक पारखी : संस्थापक, महाकाल प्रतिष्ठान (आयटीनगरी, माण)
=====================================
महाकाल प्रतिष्ठान आयोजित रास गरबा महोत्सव 2026 :-
Follow Channel Digital News9 –

दैनिक वृत्तपत्र सह पत्रकारिते मधील बारा वर्षांचा अनुभव. धारदार शब्द मांडणी, सडेतोड आणि वास्तव वादी लिखाण. सध्या तरी, मुळशी तालुक्यासह, पुणे जिल्ह्यातील दैनंदिन घडामोडी आणि बातम्यांना प्राधान्य. पोर्टल, बॅनर न्युज यासंह, युट्युब, इन्स्टा, फेसबुक, एक्स अशा सोशल मीडिया माध्यमांवर चायनल सक्रिय आहे.
जनतेच्या हक्काचं चॅनेल
‘डिजिटल न्युज9 👍🏼👍🏼
Contact :+91 98348 36140 Digital News9.





















