विद्यार्थ्यांना सुमारे ५०० शालेय गणवेशांचे तर, ग्रामस्थांसाठी ३००० छत्र्यांचे वाटप !
नेरे (विशेष प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकीची अविरत परंपरा जपत नेरे गावचे सुपुत्र व माजी आदर्श सरपंच सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गावात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा नेरे गावठाण व दत्तवाडी येथील विद्यार्थ्यांना सुमारे ५०० शालेय गणवेशांचे, तसेच समस्त नेरे ग्रामस्थांसाठी ३००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सचिन जाधव यांनी यंदाही, वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

दरम्यान, सचिनभाऊ जाधव यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात नेरे गावाचा कायापालट करण्यासाठी रस्ते, वीज, पाणी यांसारख्या अनेक मूलभूत पायाभूत सुविधांच्या कामांना वेळोवेळी गती देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता, अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे त्यांनी स्वतःच्या खर्चाने पूर्ण करून, गावाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

यांची होती प्रमुख उपस्थिती :-
अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी राजकीय, सामाजिक आणि उद्योजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने, पुणे जिल्हापरिषद गट नेते शिवाजीराव बुचडे पाटील, मुळशी पंचायत समिती सदस्या ऐश्वर्याताई वाघमारे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक दत्ताभाऊ जाधव, विद्यमान सरपंच वंदनाताई जाधव, मनसे तालुका उपाध्यक्ष गणेश शिंदे, माजी सरपंच दिगंबर जाधव, माजी उपसरपंच दत्ताभाऊ गाढवे, माजी उपसरपंच अरुण ढमाले, माजी उपसरपंच निलेश विलास जाधव, भाजपा प्रवक्ते साहेबराव जाधव, उपसरपंच विदुर जाधव, उपसरपंच जालिंदर जाधव, राजकीय सल्लागार महेश गोरे, भाजप नेते राहुल जाधव, उद्योजक युवराज पायगुडे, युवा उद्योजक तेजस शिंदे, उपसरपंच अजित ओव्हाळ आणि हभप लक्ष्मण जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामस्थ आणी मित्र परिवार उपस्थित :-
तसेच, दत्तात्रय शंकर जाधव, दत्तात्रय विलास जाधव, युवा उद्योजक सुनील जाधव, उद्योजक वैभव राऊत, युवा उद्योजक गणेश जाधव, माजी उपसरपंच शरद शिंदे, तुकाराम दातीर, विराज सातपुते, माऊली दातीर, कृष्णा जाधव, अनिल जाधव, भरत जाधव, विश्वास जाधव, अक्षय गाढवे, समीर जाधव, उद्योजक नवनाथ जाधव, हिरामण जाधव, दशरथ खाणेकर, संभाजी जाधव, विनोद आबा जाधव, महेश जाधव, बबन जाधव, जगन्नाथ जाधव आणि बाळासाहेब सुर्वे यांच्यासह नेरे गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्यादरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी मा. सरपंच सचिन जाधव यांच्या सामाजिक कार्याचा भरभरून गौरव करत, त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना केली. तसेच, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

Digital News9 टीम कडून शुभेच्छा :-
याप्रसंगी, पुणे जिल्हा शहर आणी ग्रामीण भागात निष्पक्ष आणी दर्जेदार वृत्तांकन करणारे आणी अल्पावधितच उद्योग व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक ते शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे Digital News9 चॅनेलच्या टीम कडून सुद्धा सचिन जाधव यांना शुभेच्छा देण्यात आल्या. 🎊🎉

======================================

दैनिक वृत्तपत्र सह पत्रकारिते मधील बारा वर्षांचा अनुभव. धारदार शब्द मांडणी, सडेतोड आणि वास्तव वादी लिखाण. सध्या तरी, मुळशी तालुक्यासह, पुणे जिल्ह्यातील दैनंदिन घडामोडी आणि बातम्यांना प्राधान्य. पोर्टल, बॅनर न्युज यासंह, युट्युब, इन्स्टा, फेसबुक, एक्स अशा सोशल मीडिया माध्यमांवर चायनल सक्रिय आहे.
जनतेच्या हक्काचं चॅनेल
‘डिजिटल न्युज9 👍🏼👍🏼
Contact :+91 98348 36140 Digital News9.





















