“विविध सुगंधी फुलांनी विठ्ठल मंदिर सजले”
प्रतिनिधी हिंजवडी : चैत्र महिन्याचे औचित्य साधून हिंजवडी येथील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला चंदन उटीचा लेप लावण्याचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी, विठ्ठल मंदिरात तब्बल एक टन सुवासिक फुलांचा वापर सजावट करण्यात आली होती. विठ्ठल भक्त हभप राम जांभुळकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हिंजवडी परिसरातील हजारो भक्तांनी हिंजवडी गावठाण मधील विठ्ठल मंदिरात गर्दी केली होती. चंदन उटी सोहळ्या निमित्त मंदिरात अभिषेक, पूजा आणि भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, चैत्र महिन्यात साधारण महिनाभर विविध मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तींना चंदन उटीचा लेप लावण्याची परंपरा आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने, गावातील देवतेला शीतलता मिळावी, या भावनेतून हा धार्मिक विधी केला जातो. चंदन हे नैसर्गिक थंडावा देणारे असल्यामुळे मूर्तीवर त्याचा लेप लावण्याला विशेष महत्त्व आहे. हिंजवडी गावठाण येथील विठ्ठल मंदिरात सुद्धा वासंतिक चंदन उटी व पुष्प मोहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
==============================
” गावठाण येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वासंतिक चंदन उटी लेप आणि पुष्प मोहोत्सव साजरा करण्यात आला. मोगरा, चाफा, गुलाब, निशिगंधा, कमळ, लिली, झेंडू, ॲास्टर, शेवंती सारख्या सुवासिक फुलांनी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली. देवाच्या सेवेतून निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा संदेश या विधीतून दिला जातो. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.”
(हभप रामभाऊ जांभुळकर : विठ्ठल भक्त, हिंजवडीनगरी.)
==============व्हिडीओ 👇🏼👇🏼=============

दैनिक वृत्तपत्र सह पत्रकारिते मधील बारा वर्षांचा अनुभव. धारदार शब्द मांडणी, सडेतोड आणि वास्तव वादी लिखाण. सध्या तरी, मुळशी तालुक्यासह, पुणे जिल्ह्यातील दैनंदिन घडामोडी आणि बातम्यांना प्राधान्य. पोर्टल, बॅनर न्युज यासंह, युट्युब, इन्स्टा, फेसबुक, एक्स अशा सोशल मीडिया माध्यमांवर चायनल सक्रिय आहे.
जनतेच्या हक्काचं चॅनेल
‘डिजिटल न्युज9 👍🏼👍🏼
Contact :+91 98348 36140 Digital News9.




















