Homeमहाराष्ट्रहिंजवडीत महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंजवडीत महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !

सुमारे अकराशेहुन अधिक ग्रामस्थांचा  सहभाग ; अनेक जणांनी घेतला लाभ. 

प्रतिनिधी हिंजवडी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागांतर्गत तहसील कार्यालय, मुळशी (पौड) यांच्या वतीने, हिंजवडीत महाराजस्व अभियान राबविण्यात आले. यास, आयटीनगरी परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी हजेरी लावत अभियानाचा लाभ घेतला. शुक्रवार (दि.१५) रोजी हिंजवडी येथील विठ्ठल लॅान्सच्या सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. यावेळी, उप आयुक्त संजय पलांडे, रजा राखीव जिल्हाधिकारी नामदेव टिकेकर, उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी सुरेंद्र नवले, तहसीलदार विजयकुमार चोबे तसेच, माण तलाठी संतोष राणे, हिंजवडीचे विवेक थोरात, जि.प. सदस्य शिवाजी बुचडे पाटील, पंचायत समिती सभापती मंदाताई शेळके, सदस्या ऐश्वर्या वाघमारे, नगरसेवीका स्नेहल कलाटे, श्रृती वाकडकर, रेश्मा भुजबळ व विविध गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अभियानात ४७ विद्यार्थी डोमेसाईल सर्टिफिकेट, ३८ उत्पन्नाचे दाखले ६४ मंडल भाग माण व थेरगाव अंतर्गत फेरफार निर्गत करण्यात आले. त्याचे शेतक-यांना ७/१२ व फेरफार वाटप, सात संजय गांधी योजना मंजुर, लाभ प्रमाणात नविन २१ लोकांनी योजनेकरिता अर्ज दाखल केले, २० लोकांचे आधारकार्ड दुरुस्ती, २१ नविन शिधापत्रिका करिता अर्ज दाखल झाले. तर, ५६ लोकांना शिधापत्रिकेतुन नाव कमी करणे/ नविन नावे दाखल करुन दिले सदर ठिकाणी वेगवेगळ्या चार गावांचे पाणंद रस्ते अतिक्रमणे अर्ज दाखल झाली. तसेच, ८ पंतप्रधान किसान सन्मान योजना लाभार्थ्यांना ॲग्रीस्टॅग नोंदणी करुन दिली. यावेळी, हिंजवडी येथील बिएलओंनी १२६ लोकांचे मॅपिंग व प्रोजेनी मॅपिंग काम काज केले. दिवसभरात आकाराशेहुन अधिक लोकांनी शिबीरास भेट दिली.

विनम्र आवाहन –

प्रत्येक नागरिकांना आपल्या समस्या आणी लाभार्थी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पौड तहसील याठिकाणी जाणं सहज शक्य होत नाही. त्यामुळे, शासनाच्या वतीने असे अभियान तालुक्यातील गावोगावी, मध्यवर्ती ठिकाणी राबवले जातात त्याचा, समाजातील विविध घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माण मंडल अधिकारी संदीप गायकवाड यांनी केले आहे.

====================================

पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा….👇🏼👇🏼

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑनलाइन घोटाळ्यात एचआर सल्लागाराची ४.३ लाख रुपयांची फसवणूक

0
पुणे : वाघोली येथील एका एचआर सल्लागाराने (३९) मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली, की ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी, एका प्रख्यात ई-कॉमर्स वेबसाइटचे अधिकारी...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते

0
पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल पुण्यात तरुण मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला पुणे बातम्या

0
पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शनिवारी शहरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. SPPU टीचर्स असोसिएशनने शनिवारी देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांवर...

ग्राहक तक्रार पोर्टलवर गोपनीयतेची चिंता वाढवतात, FDA म्हणते डेटा सुरक्षित | पुणे बातम्या

0
तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या त्यांच्या खाजगी तपशिलांचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती नागरिकांना वाटत आहे पुणे : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या ऑनलाइन...

उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल...

0
पुणे : हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील २६ वर्षीय तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या...

error: Content is protected !!